
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.आपण सर्वांनी सरकारी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे.